.png)
Prof. Dr. Santosh Machale
Founder-President
MA (Phycology) Ph.d२१व्या शतकात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही — तर आवश्यक आहे मनाची स्पष्टता, भावनिक स्थैर्य आणि सकारात्मक विचारशक्ती. संतोष नीतिच्या माध्यमातून आम्ही याच दिशेने समाजात विचारपरिवर्तनाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. गेल्या १५+ वर्षांच्या प्रवासात, देशातील नामांकित शाळा, महाविद्यालये आणि पोलीस विभागांमध्ये आयोजित केलेल्या शेकडो कार्यशाळांमधून मी हजारो लोकांना त्यांची अंतर्गत शक्ती ओळखून देण्याचे कार्य केले आहे. मानसशास्त्र, एनएलपी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयांतील माझा अनुभव मला दररोज नवीन काहीतरी शिकवतो — कारण प्रत्येक व्यक्तीचे मन हे एक नवीन विश्व आहे. माझे ध्येय स्पष्ट आहे – भारतातील प्रत्येक तरुण, पालक आणि शिक्षक यांना ‘माइंड पॉवर’च्या माध्यमातून आत्मविश्वास, एकाग्रता आणि आनंदाने जगण्याची नवी दृष्टी देणे. संतोष नीति हे त्या मिशनचे माध्यम आहे. — प्रा. डॉ. संतोष माचले